Madhavbaug — Advanced Ayurveda Clinics and Hospitals

हार्ट ब्लॉकेज घरच्या घरी ओळखता येते का? 5 धोकादायक गैरसमज 

हार्ट ब्लॉकेज घरच्या घरी ओळखता येते का? 5 धोकादायक गैरसमज 
Dr Priyanka Bhushan Vaidya

Medically Reviewed By

Dr Priyanka Bhushan Vaidya

Consultant Ayurvedic Physician | BAMS, Fellowship in Cosmetology | 6 Years of Clinical Experience | Expert in Diabetes Management, Gut Health & Joint Health

Last Updated

23 Aug 2026

आजकाल इंटरनेट, सोशल मीडियावर हार्ट ब्लॉकेज घरच्या घरी ओळखणे याबाबत अनेक दावे केले जातात. काही जण नाडी तपासून हार्ट ब्लॉकेज ओळखता येते असे सांगतात, तर काहीजण फक्त रक्तदाब मोजून किंवा श्वास रोखून ठेवण्याच्या चाचणीवरून हृदय निरोगी आहे की नाही हे ठरवता येते असा दावा करतात. काही घरगुती उपायांनी ब्लॉकेज पूर्णपणे निघून जाते, असेही अनेक व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु प्रत्यक्षात हे सर्व दावे चुकीचे आणि धोकादायक ठरू शकतात.

 कारण हार्ट ब्लॉकेजचे निदान केवळ लक्षणे किंवा घरगुती उपायांवरून करता येत नाही. योग्य वैद्यकीय तपासणीशिवाय स्वतःच निष्कर्ष काढल्यास उपचार उशिरा सुरू होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. 

अशा चुकीच्या दाव्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, ‘मध्वबाग’च्या डॉ. प्रियांका वैद्य ५ गैरसमज दूर करत आहेत आणि योग्य हार्ट ब्लॉकेज टेस्टवर माहिती देत आहेत.

गैरसमज १ : नाडी सामान्य असेल तर हृदयातील ब्लॉकेज कसे ओळखावे

अनेकांना वाटते की हाताची नाडी नियमित चालू असेल तर हृदय पूर्णपणे निरोगी आहे. मात्र हा सर्वात मोठा गैरसमज आहे. नाडीचा वेग आणि कोरोनरी धमन्यांमधील ब्लॉकेज यांचा थेट संबंध नसतो (Grassi, G., 1995). अनेक रुग्णांमध्ये गंभीर ब्लॉकेज असूनही नाडी अगदी सामान्य असू शकते. त्यामुळे फक्त नाडी तपासून हृदयातील ब्लॉकेज कसे ओळखावे याचा निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते.

गैरसमज २ : BP नॉर्मल म्हणजे हृदय सुरक्षित आहे

रक्तदाब सामान्य असणे हे निश्चितच चांगले लक्षण आहे, परंतु त्यामुळे हार्ट ब्लॉकेज नाही असे म्हणता येत नाही. अनेक व्यक्तींमध्ये रक्तदाब पूर्णपणे सामान्य असूनही कोरोनरी धमन्यांमध्ये ब्लॉकेज आढळू शकते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ब्लॉकेज असतेच असेही नाही. म्हणून केवळ BP मशीनवर दिसणाऱ्या आकड्यांवरून हार्ट ब्लॉकेज घरच्या घरी ओळखणे निष्कर्ष काढणे योग्य नाही.

गैरसमज ३ : छातीच्या डाव्या बाजूला दुखले तरच हार्ट ब्लॉकेज असते

चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये डाव्या बाजूला तीव्र वेदना होतात, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात हार्ट ब्लॉकेजची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. काहींना छातीत दडपण जाणवते, काहींना जिने चढताना श्वास लागतो, तर काहींना जबड्यात, पाठीत किंवा डाव्या हातात वेदना होतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये तर कोणतीही तीव्र वेदना न होता फक्त थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच लक्षणे सौम्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.

गैरसमज ४ : श्वास रोखून ठेवण्याच्या चाचणीवरून हार्ट ब्लॉकेज समजते

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओंमध्ये “३० सेकंद श्वास रोखून ठेवू शकत असाल तर तुमचे हृदय निरोगी आहे” असा दावा केला जातो. मात्र या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. एखादी व्यक्ती किती वेळ श्वास रोखू शकते हे तिच्या फुफ्फुसांच्या क्षमतेवर, वयावर आणि शारीरिक तंदुरुस्तीवर अवलंबून असते. त्याचा हार्ट ब्लॉकेजची लक्षणे सोबत थेट संबंध नसतो. त्यामुळे अशा चाचण्यांवर विश्वास ठेवून वैद्यकीय तपासणी टाळणे धोकादायक ठरू शकते.

गैरसमज ५ : घरगुती उपायांनी हार्ट ब्लॉकेज पूर्णपणे निघून जाते

लसूण, लिंबू, मध, सफरचंदाचा व्हिनेगर किंवा विविध आयुर्वेदिक काढ्यांमुळे ब्लॉकेज पूर्णपणे वितळते, असे अनेक दावे इंटरनेटवर केले जातात. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली हृदयाच्या आरोग्यासाठी निश्चितच उपयुक्त आहेत, परंतु आधीपासून असलेले ब्लॉकेज केवळ घरगुती उपायांनी नाहीसे होते, असा पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी योग्य हार्ट ब्लॉकेज टेस्ट आवश्यक आहे.

हार्ट ब्लॉकेज कोणतीही लक्षणे न देता राहू शकते का?

होय. अनेक वेळा ब्लॉकेज हळूहळू वाढत असल्यामुळे शरीर त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे बराच काळ कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही योग्य तपासणी माधवबाग क्लिनिकमध्ये केली जाऊ शकते.

मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास, नियमित हृदय तपासणी करून तुमचा धोका वेळेत समजून घेणे महत्त्वाचे आहे.

माधवबाग रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी पारंपरिक आयुर्वेदिक उपचार आणि आधुनिक निदान पद्धतींचा एकत्रित दृष्टिकोन अवलंबते.तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या हृदयातील ब्लॉकेजचे टेस्ट  अथवा निदान करण्यासाठी, आताच तुमच्या जवळच्या ‘माधवबाग’ क्लिनिकला भेट द्या.

डॉ. प्रियांका यांच्या मते, ज्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये

“सोशल मीडियावरील गैरसमजांवर नाही, तर योग्य वैद्यकीय तपासणीवर विश्वास ठेवा. तुमचं हृदय अनमोल आहे.”

— डॉ. प्रियांका वैद्य. बी.ए.एम.एस. हृदयरोग तज्ञ

जर छातीत तीव्र दडपण किंवा वेदना सुरू झाली, ती वेदना हात, जबडा, मान किंवा पाठीकडे पसरू लागली, अचानक श्वास लागला, थंड घाम आला, मळमळ झाली, चक्कर आली किंवा व्यक्ती बेशुद्ध पडली, तर वेळ न दवडता तातडीची वैद्यकीय मदत घ्यावी. अशा परिस्थितीत स्वतः निदान करण्याचा किंवा घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करू नये. माधवबाग रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी पारंपरिक आयुर्वेदिक उपचार आणि आधुनिक निदान पद्धतींचा एकत्रित दृष्टिकोन अवलंबते.तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या हृदयातील ब्लॉकेजचे टेस्ट  अथवा निदान करण्यासाठी, आताच तुमच्या जवळच्या ‘माधवबाग’ क्लिनिकला भेट द्या.

माधवबागमध्ये हृदयाच्या आरोग्याचे मूल्यमापन

माधवबागमध्ये हृदयविकाराचा धोका असलेल्या प्रत्येक रुग्णाचे सविस्तर मूल्यमापन केले जाते. आधुनिक निदान पद्धती, वैयक्तिक जीवनशैली मार्गदर्शन, संतुलित आहार, आयुर्वेदावर आधारित उपचार आणि नियमित फॉलो-अप यांच्या मदतीने हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन दिले जाते. हृदयातील ब्लॉकेजची सविस्तर उपचारांविषयी अधिक वाचण्यासाठी कृपया येथे भेट द्या:

जर तुम्हाला हार्ट ब्लॉकेजची लक्षणे जाणवत असतील किंवा तुम्ही उच्च जोखमीच्या गटात येत असाल, तर घरच्या घरी अंदाज बांधण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

Q.1 हार्ट ब्लॉकेज घरच्या घरी ओळखणे शक्य आहे का?

नाही. नाडी, रक्तदाब (BP), श्वास रोखून ठेवण्याची चाचणी किंवा इतर कोणत्याही घरगुती पद्धतीने हार्ट ब्लॉकेज निश्चित करता येत नाही. यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य तपासण्या आवश्यक असतात.

Q.2. हार्ट ब्लॉकेजची लक्षणे नेहमी स्पष्ट दिसतात का?

नाही. काही लोकांमध्ये हार्ट ब्लॉकेजची लक्षणे जसे की छातीत दडपण, श्वास लागणे किंवा थकवा दिसू शकतात, तर अनेकांना सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे जोखीम घटक असल्यास नियमित तपासणी महत्त्वाची आहे.

Q.3. हृदयातील ब्लॉकेज कसे ओळखावे?

हृदयातील ब्लॉकेज कसे ओळखावे यासाठी केवळ लक्षणांवर अवलंबून राहता येत नाही. ECG, 2D Echo, TMT, CT Coronary Angiography किंवा Coronary Angiography यांसारख्या तपासण्यांच्या मदतीने डॉक्टर अचूक निदान करतात.

Q.4. हार्ट ब्लॉकेज टेस्ट कोणती करावी?

कोणती हार्ट ब्लॉकेज टेस्ट करायची हे तुमची लक्षणे, वय, वैद्यकीय इतिहास आणि जोखीम घटक यावर अवलंबून असते. योग्य तपासणीची निवड डॉक्टरच करतात.

Q.5. छातीत दुखत नसले तरी हार्ट ब्लॉकेज असू शकते का?

होय. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा काही रुग्णांमध्ये हार्ट ब्लॉकेज असूनही छातीत वेदना जाणवत नाहीत. अशा वेळी श्वास लागणे, थकवा, घाम येणे किंवा जबड्यात व हातात वेदना यांसारखी इतर लक्षणे दिसू शकतात.

संदर्भ

  1. Grassi, G., Giannattasio, C., Failla, M., Pesenti, A., Peretti, G., Marinoni, E., Fraschini, N., Vailati, S. and Mancia, G., 1995. Sympathetic modulation of radial artery compliance in congestive heart failure. Hypertension, 26(2), pp.348-354.
Dr Priyanka Bhushan Vaidya

About The Author

Dr Priyanka Bhushan Vaidya

Dr. Priyanka Bhushan Vaidya is a qualified Ayurvedic physician who graduated from D. Y. Patil School of Medicine and holds a Fellowship in Cosmetology. With six years of clinical experience at Madhavbaug, she is dedicated to helping patients improve their health through personalised Ayurvedic care and lifestyle-based interventions. Her areas of expertise include diabetes management, gut health, and joint disorders. She focuses on integrating Ayurvedic principles with practical dietary and lifestyle modifications to support better health outcomes, preventive healthcare, and long-term well-being. Throughout her professional journey, Dr. Priyanka has helped numerous patients work towards improved health and has received recognition for her contributions to patient care and medical improvement. She is passionate about patient education, preventive medicine, and personalised treatment approaches that address individual health needs. Dr. Priyanka believes in promoting healthier lives through a holistic approach that combines the traditional wisdom of Ayurveda with contemporary healthcare practices. Her mission is to empower individuals to make informed health decisions, adopt sustainable lifestyle habits, and improve their overall quality of life.
Madhavbaug centres across IndiaLeafLocate a Centre

Find a Madhavbaug Centre Near You

With over 300+ clinics and specialized hospitals across India, find expert reversal care right in your neighborhood.

Madhavbaug centres across India

Disclaimer

The content on this website is for informational purposes only and should not be considered a substitute for medical advice. Please consult a qualified Madhavbaug Ayurvedic doctor before starting any treatment.

Madhavbaug

Start Your Journey to a Medicine-Free Life with Madhavbaug

Don't just manage your condition. Overcome it. Take the first step toward sustainable, evidence-based chronic disease reversal.

Book a Consultation
Nearest CentresCall Now